Suresh Raina reveals about tam not winning IPL trophy : रॉयल चॅलेंजर बंगळुरुसाठी आयपीएल २०२४ चा हंगाम आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल, तर त्यांना सातत्याने उत्कृष्ट क्रिकेट खेळावे लागेल. आयपीएलच्या इतिहासात, आरसीबीचे नाव अशा संघांमध्ये समाविष्ट आहे, जे एकदाही आयपीएल ट्रॉफीवर कब्जा करू शकले नाहीत. क्रिकेटचे अनेक दिग्गज संघात असूनही या संघाला यश मिळवता आलेले नाही. यावर आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज सुरेश रैनाने नुकतीच एक मुलाखत दिली आणि त्यादरम्यान त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी), पंजाब किंग्स (पीबीकेएस) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) सारख्या आयपीएल संघांवर जोरदार टीका केली. ललनटॉपशी बोलताना रैना म्हणाला की आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात ज्या संघांनी मोठ्या प्रमाणात पार्ट्या केल्या त्यांनी आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. त्याचबरोबर सीएसके त्यांच्या सामन्यांनंतर कधीही पार्टी आयोजित केली नाही आणि म्हणूनच संघाने ५ आयपीएल आणि २ चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकल्या आहेत.

‘चेन्नईने कधीही पार्टी केली नाही’ –

सुरेश रैना म्हणाला, “चेन्नईने कधीही पार्टी केली नाही. त्यामुळेच ते सर्वाधिक यशस्वी ठरले आहेत. पार्टी करत असलेल्या २-३ संघांनी अजून आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. असे काही संघ आहेत जे आजपर्यंत जिंकू शकलेले नाहीत, त्यांनी जोरदार पार्टी केली असावी. आम्ही (सीएसके)असे केले नाही. त्यामुळे आमच्याकडे ५ आयपीएल ट्रॉफी आणि २ चॅम्पियन्स लीग ट्रॉफी आहेत. एमआयने पण ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत.”

हेही वाचा – KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?

‘तुम्ही रात्री उशिरापर्यंत पार्टी केली, तर सकाळी कसे खेळाल?’

सुरेश रैनाने खुलासा केला की, सीएसकेने पार्टी न करण्यामागील कारण म्हणजे प्रत्येक क्रिकेटर आणि व्यवस्थापन कर्मचारी त्यांच्या कामाबद्दल गंभीर होते. पुढे बोलताना रैना म्हणाला, “तुम्ही रात्री उशिरापर्यंत पार्टी केली, तर सकाळी कसे खेळाल? मे-जूनच्या उन्हाळ्यात तुम्ही रात्रभर पार्टी केली तर दुपारचा सामना कसा खेळणार? रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू राहू नये, याकडे संपूर्ण टीम विशेष लक्ष देत होती. आम्ही भारतासाठीही खेळतोय हे लक्षात ठेवायला हवं होतं. जर मी चांगला खेळलो नाही तर माझा कर्णधार मला का निवडेल? आता, मी मुक्त आहे, मी निवृत्त आहे. आम्ही पार्टी करू शकतो.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina says teams who partyed in initial ipl season rcb pbks dc didnt win ipl trophy vbm