Who will play Qualifier 2 if RCB vs RR eliminator match is abandoned : आयपीएल २०२४ मधील सर्व ७० साखळी सामने रविवारी पाडले. हंगामातील शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता, तो पावसामुळे रद्द करण्यात आला. ज्यामुळे प्लेऑफ्ससाठी पात्र ठरलेल्या ४ संघाचे गुणतालिकेतील स्थान निश्चित झाले. आता प्लेऑफचे सामने होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे प्लेऑफ्समध्ये एकूण ४ सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी एलिमिनेटर सामना २२ मे रोजी आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा क्वालिफायर सामना कोण खेळणार? याबद्दल जाणून घेऊया.

प्लेऑफ्स सामन्यांसाठी राखीव दिवस आहे का?

आयपीएल २०२४ वर पावसाचे संकट निर्माण झाले आहे. या हंगामात आतापर्यंत एकूण ३ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्याआधीच करोडो चाहत्यांच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे की, हा सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर ट्रॉफीच्या या शर्यतीत कोण राहणार आणि कोण? या शर्यतीतून बाहेर पडणार?

Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ravichandran Ashwin Calls Sanju Samson Selfish After RR Captain Selected For T20 World Cup
“तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”
IPL 2024 Prize money updates in marathi
IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Becomes the First Batsman to hit 600 Sixes in International Cricket
T20 WC 2024: रोहित शर्माच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज
India to Face Australia in T20 World Cup 2024 Super Eight Stage
T20 WC 2024: भारत वि ऑस्ट्रेलिया सुपर८ फेरीत येणार आमनेसामने, ICCने केलं जाहीर; पाहा टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक

आयपीएल २०२३ च्या हंगामापर्यंत, प्लेऑफ सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नव्हता, तो फक्त आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी ठेवण्यात आला होता. पण या हंगाामापासून एलिमिनेटर सामना आणि क्वालिफायर सामन्यांसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आले आहेत आहे. अशा परिस्थितीत आरसीबी आणि आरआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास हा सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.

हेही वाचा – IPL 2024 : एमएस धोनी IPL मधून निवृत्ती घेणार की नाही? चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने केला मोठा खुलासा

सामना रद्द झाल्यास कोणाला होणार फायदा?

राखीव दिवशीही हवामान सहकार्य करत नाही असे मानू या, तर पंच किमान ५-५ षटकांचा सामन आयोजित करण्याचा प्रयत्न करतील. हेही शक्य नसेल तर सुपर ओव्हर घेण्यात येईल. मात्र सुपर ओव्हर्सचा पण सामना खेळला गेला नाही, तर कोणता संघ क्वालिफायर खेळणार, हे पॉइंट टेबलवर ठरवले जाईल. गुणतालिकेत दोन्हीपैकी जो संघ अव्वल स्थानावर राहिला होता, तो संघ दुसरा क्वालिफायर खेळण्यासाठी पात्र ठरेल. त्याचबरोबर दुसरा संघ बाहेर पडेल. या नियमामुळे आरसीबीला मोठा फटका बसणार आहे. जर सामना रद्द झाला, तर आरसीबी संघ बाहेर पडेल आणि राजस्थान रॉयल्स पुढच्या फेरीत म्हणजे दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.

हेही वाचा – IPL 2024 : आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्यानंतर धोनीचा शोध घेतानाचा विराट कोहलीचा VIDEO व्हायरल

आयपीएल २०२४च्या प्लेऑफ्सचे वेळापत्रक:

क्वालिफायर-१: केकेआर विरुद्ध एसआरएच, २१ मे, अहमदाबाद
एलिमिनेटर: आरसीबी विरुद्ध आरआर, २२ मे, अहमदाबाद
क्वालिफायर -२: क्वालिफायर १ पराभूत वि एलिमिनेटर विजेता, २४ मे, चेन्नई
फायनल – क्वालिफायर १ विजेता विरुद्ध क्वालिफायर २ विजेता ,२६ मे, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई,