आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातील दिग्गजांचा पाहण्याची संधी देणाऱ्या महेश भूपतीच्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग(आयपीटीएल)च्या भारतातील पहिल्या टप्प्याची तिकिटे २० मिनिटांत संपली. ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर ही तिकीटे उपलब्ध होताच व्हच्युर्अल चाहत्यांची झुंबड उडाली आणि अवघ्या काही वेळात तिकिटे संपल्याची पाटी संकेतस्थळावर झळकली. ‘‘टेनिसरसिकांच्या प्रतिसादाने आम्ही भारावलो आहोत. जगातील सर्वोत्तम टेनिसपटूंचा खेळ भारतीय टेनिसरसिकांना पाहता, यावा हेच आमचे उद्दिष्ट आहे,’’ असे इंडियन ऐसेस संघाच्या प्रवक्त्याने सांगितले. ‘‘तिकीट विक्रीचा दुसरा टप्पा सोमवारी, ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. देशात पहिल्यांदाच टेनिस पाहण्यासाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्ही अनुभवत आहोत. हा प्रतिसाद अपवादात्मक असा आहे,’’ असे उद्गार महेश भूपतीने काढले. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत दिल्लीतील इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियमध्ये ही टेनिसमैफल रंगणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2014 रोजी प्रकाशित
टेनिस लीगच्या तिकिटांसाठी चाहत्यांची ऑनलाइन झुंबड
आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातील दिग्गजांचा पाहण्याची संधी देणाऱ्या महेश भूपतीच्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग(आयपीटीएल)च्या भारतातील पहिल्या टप्प्याची तिकिटे २० मिनिटांत संपली. 'बुक माय शो' या संकेतस्थळावर ही तिकीटे उपलब्ध होताच व्हच्युर्अल चाहत्यांची झुंबड उडाली आणि अवघ्या काही वेळात तिकिटे संपल्याची पाटी …
First published on: 01-11-2014 at 03:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iptl tickets go on sale from friday