scorecardresearch

माझ्या लग्नाच्या चर्चा धादांत खोट्या- रोनाल्डिनो

एका खासगी समारंभात विवाहसोहळा पार पडेल असंही म्हटलं गेलं होतं. पण, या सर्व अफवाच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

Ronaldinho
रोनाल्डिनो
फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जाणऱ्या रोनाल्डिनोच्या लग्नाच्या चर्चांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या. तो एकाच वेळी दोन्ही प्रेयसींशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण, या सर्व चर्चा खोट्या असून, मी तसं काहीही करत नाहीये, असं खुद्द रोनाल्डिनोनेच स्पोर्ट्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

मला सगळ्यांचे लग्नाविषयीची विचारणा करण्यासाठी सर्वांचे फोन येत आहेत. पण, मी लग्न करतच नाहीये. हे सर्व धादांत खोटं आहे, असं तो या मुलाखतीदरम्यान म्हणाला. ब्राझीलमधील ‘ओ`डिया’ या वृत्तपत्राने रोनाल्डिनोच्या लग्नाचं वृत्त प्रसिद्ध करत तो एकाच वेळी आपल्या दोन्ही प्रेयसींशी विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं होतं. इतकच नव्हे तर एका खासगी सोहळ्यात हा विवाहसोहळा पार पडेल असंही म्हटलं गेलं होतं. पण, या सर्व अफवाच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

‘ब्युटी विथ गेम’; जगातील या ‘टॉप ५’ सुंदर महिला क्रिकेटपटू पाहिल्यात का?

रोनाल्डिनो २०१६ पासून, बिट्रीझ सोझा Beatriz Souza हिला डेट करु लागला होता. पण, असंही म्हटलं जातं की बिट्रीझला डेट करताना त्याने प्रिसिलीयासोबतचं Priscilla नातंही कायम ठेवलं होतं. इकतच नव्हे, तर ब्राझीलच्या स्थानिक वृत्तपत्रांच्या माहिनुसार गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून तो आपल्या दोन्ही प्रेयसींसोबत रिओ दी जिनेरो इथे असणाऱ्या एका आलिशान मेंशनमध्ये राहात होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Its the biggest lie footballer ronaldinho rubbishes marriage rumours

ताज्या बातम्या