कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राजीनाम्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली, तरी माजी सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनी पुन्हा बीसीसीआयमध्ये परतण्यास नकार दिला. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर जगदाळे आणि शिर्के यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ‘‘राजीनामा मागे घेण्याची एकमताने मागणी करण्यात आली. पण त्यांची मागणी मी सकारात्मकतेने घेत नसल्याचे मला वाईट वाटत आहे. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नसला, तरी मी पुन्हा परतणार नाही. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली नाही, याचे वाईट वाटते. या बैठकीत वैयक्तिक मुद्दय़ांवर चर्चा करण्यापेक्षा सध्या क्रिकेटमध्ये जे काही घडत आहे, त्या गंभीर मुद्दय़ांवर चर्चा करण्याची गरज होती,’’ असे जगदाळे यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2013 रोजी प्रकाशित
जगदाळे, शिर्के यांचा परतण्यास नकार
कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राजीनाम्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली, तरी माजी सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनी पुन्हा बीसीसीआयमध्ये परतण्यास नकार दिला. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर जगदाळे आणि शिर्के यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
First published on: 03-06-2013 at 02:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagdale shirke refuse to return to bcci