इंग्लंडविरुद्धची दुसरी अ‍ॅशेस कसोटी ऑस्ट्रेलियाने वाचवली. स्टीव्ह स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्नस लाबुशेनने केलेल्या झुंजार अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाला सामना अनिर्णित राखण्यात यश आले. या सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर पुन्हा तो जिद्दीने मैदानात उतरला खरा.. पण तो लगेचच बाद झाला. त्याने ८० धावांची खेळी केली. त्याला उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी लागली. तिसऱ्या कसोटीत तो खेळू शकेल की नाही याबाबतही साशंकता आहे. या दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने जोफ्रा आर्चरला सुनावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मैदानावर खेळताना विविध प्रकारच्या चेंडूंचा सामना करावा लागतो. बाऊन्सर चेंडू हा खेळाचाच एक भाग आहे. पण ज्यावेळी आपण टाकलेला बाऊन्सर फलंदाजाच्या डोक्यावर आदळतो आणि फलंदाज मैदानावरच कोसळतो, तेव्हा फलंदाजाकडे धावत जाऊन त्याची खुशाली पाहणे हे गोलंदाजाचे कर्तव्य आहे. जेव्हा आर्चरने टाकलेला चेंडू जोरात स्मिथच्या मानेवर आदळला आणि स्मिथ कळवळत होता, तेव्हा आर्चर स्मिथजवळ न जाता तसाच तिथून निघून गेला, हे खूप चुकीचे आहे. माझ्या चेंडूवर एखादा फलंदाज जखमी झाला तर मी सर्वप्रथम त्या फलंदाजाकडे धावत जायचो, अशा शब्दात अख्तरने आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान, बेन स्टोक्सने साकारलेल्या शतकामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २६८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी ढेपाळली. परंतु लाबुशेन (५९) आणि ट्रेव्हिस हेड यांच्या (४२*) कामगिराच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना संपेपर्यंत ६ बाद १५४ धावा करत सामना वाचवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jofra archer steve smith helmet ball hit shoaib akhtar angry vjb
First published on: 19-08-2019 at 15:47 IST