आरसीएफ थळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पध्रेत आरसीएफ, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलीस, मध्य रेल्वे यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आरसीएफने रायगड पोलीस संघाचा २६-२३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. आरसीएफचे रवींद्र कुमावते, आनंद पाटील, संदेश कुळे चमकले. रायगड पोलीसचे अनिकेत पाटील व चंदन सिंग छान खेळले. मध्य रेल्वेने युनियन बँकेचे आव्हान ३२-२३ असे परतवून उपांत्य फेरी गाठली. मध्य रेल्वेचे विनोद हल्याळकर, अमीर धुमाळ, परेश चव्हाण यांनी चांगला खेळ केला. युनियन बँकेचे सतीश खांबे व अजिंक्य कापरे चमकले.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुंबई पोलिसांनी चुरशीच्या लढतीत नाशिक आर्मी संघाचा २२-१९ असा पराभव केला. मुंबई पोलिसांचे राजन तांडेल व सचिन मिसाळ, रितेश साटम व विराट पाटील यांनी चांगला खेळ केला. नाशिक आर्मीचे अमर सिंग व विजय पाल चमकले. भारत पेट्रोलियमने जेएसडब्ल्यू संघावर २१-६ अशी सहज मात केली. भारत पेट्रोलियमचे सुनील आडके, जितेश जोशी, विशाल माने छान खेळले. जेएसडब्ल्यूचे सिद्धार्थ पाटील व अनिकेत कोठेकर यांनी चांगला खेळ केला.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2015 रोजी प्रकाशित
भारत पेट्रोलियम, मुंबई पोलीस, आरसीएफ, मध्य रेल्वे उपांत्य फेरीत
आरसीएफ थळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पध्रेत आरसीएफ, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलीस, मध्य रेल्वे यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

First published on: 09-05-2015 at 04:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi competition