देवगडमध्ये शनिवारपासून १७व्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पध्रेला सुरुवात होत आह़े  क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या यजमानपदाखाली जामसांडे सन्मित्र मंडळ, देवगड येथे पाच दिवस कबड्डीचा थरार रंगणार आह़े या स्पध्रेला महाराष्ट्र सरकारकडून ५० लाखांचा अनुदान मिळतो़  या स्पध्रेत पुरुष व महिला गटांत प्रत्येकी १६ म्हणजेच एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला आह़े विजयी संघाला एक लाख रुपयांचे, तर उपविजेत्या संघाला ७५ हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आह़े
स्पध्रेचा पहिला सामना यजमान सिंधुदुर्ग विरुद्ध रत्नागिरी असा होणार असून मुंबई उपनगर विरुद्ध नंदुरबार अशा पुरुष गटाच्या लढती होतील़  महिला गटात सिंधुदुर्गचा संघ पुण्याशी, तर मुंबई उपनगर संघ ठाण्याशी दोन हात करतील़  गतवर्षी पुण्यात पार पडलेल्या या स्पध्रेत पुरुष गटात ठाण्याने मुंबई शहरला नमवून, तर महिला गटात पुण्याने मुंबई शहरलाच नमवून जेतेपदाला गवसणी घातली होती़  
यंदा या स्पध्रेत रोख रकमेच्या बक्षिसांचा वर्षांव करण्यात आला आह़े स्पध्रेत  प्रत्येक साखळी सामन्यांत विजेत्या संघाला रोख ५००० रुपये, तर पराभूत संघाला रोख २५०० रुपये देण्यात येतील़  उपउपांत्य फेरीतील विजयी संघाला २५ हजार, तर पराभूत संघाला १५ हजार देण्यात येतील़  उपांत्य फेरीतील विजयी संघ ५० हजार, तर पराभूत संघ २५ हजार रुपयांची कमाई करेल़  अशी एकूण १३ लाख ३० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पध्रेतील गटवार विभागणी
पुरुष गट – अ : मुंबई उपनगर, कोल्हापूर, नंदुरबार, अकोला; ब : पुणे, रायगड, परभणी, चंद्रपूर; क : सांगली, ठाणे, धुळे, अमरावती; ड : रत्नागिरी, मुंबई शहर, सिंधुदुर्ग, नागपूर.
महिला गट – अ : पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती; ब : मुंबई उपनगर, औरंगाबाद, ठाणे, यवतमाळ; क : मुंबई शहर, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा; ड : सांगली, रायगड, अहमदनगर, नागपूर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi thrills in deogarh from today
First published on: 07-03-2015 at 02:47 IST