भारताच्या पारुपल्ली कश्यप व पी.व्ही.सिंधू यांनी सईद मोदी स्मृती बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत अंतिम फेरी गाठली. लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत स्थान मिळविणाऱ्या कश्यप याने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआतरे याचे आव्हान संपुष्टात आणले. चुरशीने झालेला हा सामना त्याने २१-१८, २३-२१ असा जिंकला. अंतिम फेरीत त्याची थायलंडच्या तानोंगसाक सेसोम्बुनुसुक याच्याशी गाठ पडणार आहे. उपांत्य लढतीत त्याने आलमसिया युनूस याच्यावर २१-१४, २१-१७ अशी मात केली.
महिलांच्या उपांत्य फेरीत सिंधू या उदयोन्मुख खेळाडूने थायलंडच्या सापसिरी तेरातानाचाई हिच्यावर २१-१२, २१-१४ असा विजय नोंदविला. सिंधू हिला विजेतेपदासाठी लिंडावेनी फानेत्री हिच्याशी खेळावे लागणार आहे. उपांत्य लढतीत तिने नोझोमी ओकुशारा हिला २२-२०, २१-१६ असे पराभूत केले.
कश्यप याने उपांत्य सामन्यात वर्चस्व गाजविले तरी दुसऱ्या गेममध्ये त्याला झगडावे लागले. दुसऱ्या गेममध्ये त्याच्याकडे १७-१० अशी आघाडी होती. मात्र सुगिआतरे याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. त्याने कश्यपला प्रत्येक गुणाकरिता झुंज दिली. त्याने आघाडीही घेतली होती मात्र कश्यपने पुन्हा खेळावर नियंत्रण मिळविले आणि शेवटपर्यंत आघाडी टिकवित सामना जिंकला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2012 रोजी प्रकाशित
सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धा : कश्यप, सिंधू अंतिम फेरीत
भारताच्या पारुपल्ली कश्यप व पी.व्ही.सिंधू यांनी सईद मोदी स्मृती बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत अंतिम फेरी गाठली. लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत स्थान मिळविणाऱ्या कश्यप याने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआतरे याचे आव्हान संपुष्टात आणले.

First published on: 23-12-2012 at 01:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashyap sindhu storm into finals of india gp badminton