आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेद्वारे पीटरसनचे पुनरागमन?

इंग्लंडचा माजी फलंदाज केवीन पीटरसन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक झाला आहे.

इंग्लंडचा माजी फलंदाज केवीन पीटरसन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक झाला आहे. मात्र इंग्लंडऐवजी आपल्या जन्म ठिकाणच्या देशाकडून म्हणजेच दक्षिण आफ्रिकेद्वारे पुनरागमन करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पीटरसनला २०१३-१४ च्या अ‍ॅशेल मालिकेनंतर इंग्लंड संघातून डच्चू देण्यात आला होता. २०१८ मध्ये तो आफ्रिकेकडून खेळण्यासाठी पात्र होऊ शकतो. तो म्हणाला, ‘‘मला अजूनही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याची इच्छा आहे व त्याकरिता आवश्यक असणारी क्षमताही माझ्याकडे आहे. जर माझी इच्छा पूर्ण झाली तर मला स्वप्न साकार झाल्याचे समाधान मिळेल. आफ्रिकेकडून खेळण्यासाठी मला आणखी एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय सामने हे प्रत्येक खेळाडूसाठी हवीहवीशी गोष्ट असते. मी गेली दोन वर्षे त्यापासून दूर राहिलो आहे. अर्थात जर पुन्हा इंग्लंडने मला संधी दिली तर ती संधीदेखील मी सोडणार नाही.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kevin pietersen considers playing for south africa