इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईमध्ये आहे. स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये त्याचा समावेश आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे. पीटरसनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ इंग्लंडचा असल्याचे म्हटले जात आहे, यात वृद्ध खेळाडू फलंदाजी करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, एक फलंदाज रन आउट झाल्यानंतर रागाने बॅट त्याच्या सहकारी खेळाडूच्या दिशेने फेकतो, ही बॅट थेट त्याच्या तोंडावर बसते. धावचीत होणाऱ्या फलंदाजाला त्याची चूक कळताच तो सहकारी फलंदाजाकडे धाव घेतो. सुदैवाने, बॅट लागलेल्या खेळाडूला कोणतीही दुखापत होत नाही.

स्ट्राईकवर असलेला फलंदाज धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाला कॉल देतो, पण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्याचे कळताच स्ट्राईकवरील फलंदाज पुन्हा पाठी जातो, यात नॉन स्ट्राईकवरील फलंदाज बाद होतो. रागाच्या भरात तो त्याची बॅट जमिनीकडे फेकतो, पण त्याचा अंदाज चुकतो आणि ती बॅट स्ट्राईकवरील फलंदाजाला लागते. आपली चूक कळताच बाद झालेला फलंदाज आपल्या सहकाऱ्याकडे धाव घेतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकपनंतरही टीम इंडियाचा असणार ‘पॉवरपॅक’ कार्यक्रम; ‘हे’ चार देश करणार भारत दौरा

हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.