करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोना फैलाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून भारतातील आघाडीची टी २० लीग IPL चे आयोजनदेखील अनिश्चित काळासाठी लांबणीवर ढकलण्यात आले आहे. त्यामुळे सारेच खेळाडू आपल्या घरी आहेत. त्यामुळे लॉकडाउनमध्ये वाढदिवस आलेला भारताचा फलंदाज लोकेश राहुल एकटा पडला. अशा परिस्थीतीत राहुलला त्याच्या सहकाऱ्यांकडुन आणि चाहत्यांकडून हटके शुभेच्छा मिळाल्या.

लोकेश राहुलने शनिवारी २९ व्या वर्षात पदार्पण केले. रात्री १२ वाजल्यापासूनच राहुलवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सर्वप्रथम राहुलचा खास मित्र हार्दिक पांड्याने शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

Happy birthday brotherman Always got your back

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने राहुलची कारकिर्दीतील कामगिरी उल्लेखित करत त्याला शुभेच्छा दिल्या. राहुलचा IPL चा संघ किंग्ज इलेव्हन पंजाब, BCCI, सहकारी वृद्धिमान साहा आणि चाहता वर्ग साऱ्यांनी त्याला हटके शुभेच्छा दिल्या.

चाहत्यांनीही दिल्या शुभेच्छा

दरम्यान, राहुल कॉफी विथ करण प्रकरणामुळे टीकेचा धनी झाला होता. तशातच खराब फॉर्मने त्याला ग्रासले होते. पण त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन करत स्वत:चे संघातील स्थान भक्कम केले. तसेच गरज भासल्यास आपण यष्टीरक्षकाची भूमिकाही पार पाडू शकतो, हे त्याने दाखवून दिले.