KL Rahul Clean Bowled on Chris Woakes Ball Video: भारत आणि इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात भारताची सुरूवात फारशी चांगली झालेली नाही. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ फलंदाजीला उतरला आहे. पहिल्या दिवशी दिवसभर पावसाचं चिन्ह असल्याने पहिल्या सत्रातच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे लंचब्रेक देखील लवकर घ्यावा लागला आणि ओल्या आऊटफिल्डमुळे सामनाही उशिरा सुरू होत आहे. दरम्यान भारताने सुरूवातीच्या षटकांमध्येच जैस्वालनंतर राहुलची विकेटही गमावली.

यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी भारताकडून सलामीला उतरली होती. गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर यशस्वी जैस्वाल चौथ्या षटकातच बाद झाला. यानंतर राहुल आणि साई सुदर्शन यांनी संघाचा डाव सावरला. पण केएल राहुलही ख्रिस वोक्सच्या चेंडूवर गडबडला आणि विकेट देऊन बसला.

वोक्सला गोलंदाजी देण्याचा इंग्लंडचा मास्टरप्लॅन सफल

इंग्लंड संघाने ख्रिस वोक्स आणि गस एटकिन्सन या जोडीसह गोलंदाजीला सुरूवात केली. यानंतर ४ षटकं झाल्यावर वोक्सला थांबवून जोश टंगला गोलंदाजीला दिली. पण जोश टंग जणू गोलंदाजीच विसरला असल्यासारखी गोलंदाजी करत त्याने वाईड चेंडूंवर २ चौकार देत अधिकच्या धावा दिल्या. यानंतर वोक्सला दुसऱ्या एन्डवर गोलंदाजी देण्याचा कर्णधाराने निर्णय घेतला आणि तो सफल ठरला.

केएल राहुलने इंग्लंडला दिली विकेट

वोक्सने पुन्हा स्पेलला सुरूवात केल्यानंतर त्याने फक्त १ धाव दिली होती. वोक्सने योग्य लाईन लेंग्थसह गोलंदाजी करत होता, त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर फटके खेळणं सोपं नव्हतं. राहुल या मालिकेत चांगल्या फॉर्मात असून तो चांगल्या चेंडूंना सन्मान देत होता, काही चेंडू सोडत होता. तर वाईट चेंडूंवर फटके खेळत होता. वोक्सच्या १६व्या षटकातील पहिल्या चेंडूवर राहुल कट मारायला गेला, पण चेंडू त्याच्या बॅटला लागून स्टम्पवर जाऊन आदळला आणि तो क्लीन बोल्ड झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या दिवशीच पावसाची हजेरी

भारत आणि इंग्लंड पाचव्या कसोटीत पहिल्या सत्रात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे लंचब्रेक लवकर घेण्यात आला. त्यानंतर मैदाना ओले असल्याने सामना तासभर सुरू झालेला नाही. भारताने पहिल्या सत्रात २ बाद ७२ धावा केल्या आहेत.