नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळण्यासाठी फलंदाज केएल राहुलने गुरुवारी सराव केला असला, तरी त्याला फलंदाजी करताना अजूनही वेदना जाणवत असल्याचेच दिसून आले. यामुळे अखेरच्या सामन्यातही राहुल खेळण्याची शक्यता कमीच आहे.

हेही वाचा >>> BCCI चा अय्यर-किशनला दणका, सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं, पाहा रोहित, विराट, ऋतुराजला किती रुपये मिळणार?

match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?

हैदराबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतरच राहुलला उजव्या मांडीच्या दुखापतीने घेरले आणि तेव्हापासून तो भारतीय संघाबाहेरच आहे. रजत पाटीदारला संधी साधण्यात आलेले अपयश आणि श्रेयस अय्यरने दुखापतीमुळेच घेतलेली माघार यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) फलंदाजांच्या शोधात आहे. गेल्यावर्षी ‘आयपीएल’मध्ये झालेल्या दुखापतीतून पूर्ण बरे झाल्याचे सांगत राहुलने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून पुनरागमन केले. मात्र, त्या मालिकेत यष्टिरक्षक आणि फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना पुन्हा एकदा त्याच्या दुखऱ्या मांडीवर ताण पडला आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याच्या दुखापतीने डोके वर काढले.

बुमरा अखेरच्या कसोटीत खेळणार?

भारताने कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकली असली, तरी जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी प्रत्येक सामन्यात मिळणारे गुण देखील तेवढेच महत्त्वाचे ठरत असल्यामुळे भारत पाचव्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला खेळविण्याची शक्यता अधिक आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांबरोेबर इंग्लंडच्या फलंदाजांनी बुमराचा अधिक धसका घेतला आहे.