scorecardresearch

कोरिया खुली  बॅडिमटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतची आगेकूच

श्रीकांतने मलेशियाच्या जागतिक क्रमवारीत ३५व्या स्थानावरील डॅरेन लीवचा २२-२०, २१-११ असा पराभव केला.

सुनचॅन : भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत या बॅडिमटनपटूंनी बुधवारी शानदार विजयांसह कोरिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

सिंधूने अमेरिकेच्या लॉरेन लॅमला २१-१५, २१-१४ असे नामोहरम केले, तर श्रीकांतने मलेशियाच्या जागतिक क्रमवारीत ३५व्या स्थानावरील डॅरेन लीवचा २२-२०, २१-११ असा पराभव केला.

पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने कोरियाच्या ताई यँग शिन आणि वँग चॅन जोडीवर २१-१६, २१-१५ असा विजय मिळवला. याचप्रमाणे एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीला पुढे चाल देण्यात आली. कारण कोरियाच्या बा डा किम आणि ही यंग पार्क जोडीने माघार घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Korea open badminton pv sindhu stormed into second round zws

ताज्या बातम्या