कुमानिया बुद्धिबळ स्पर्धा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा युवा ग्रँडमास्टर लेऑन ल्युक मेंडोसा याने हंगेरी येथे झालेल्या दुसऱ्या कुमानिया बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

गोव्याच्या १५ वर्षीय मेंडोसाने या स्पर्धेत अपराजित राहताना चार विजय आणि पाच डाव बरोबरीत सोडवले. त्याने नऊ फेऱ्यांमध्ये ६.५ गुणांची कमाई केली. मेंडोसा आणि स्लोव्हाकियाचा मिलान पॅचर यांचे समान गुण झाले, पण सरस टाय-ब्रेकच्या आधारे मेंडोसाने जेतेपद प्राप्त केले.

पहिला डाव बरोबरीत सोडवल्यानंतर मेंडोसाने सलग चार विजय प्राप्त केले. त्यानंतरचे चार डाव बरोबरीत सोडवत त्याने ६.५ गुण मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumania chess tournament grandmaster leon mendoza won the title abn
First published on: 27-03-2021 at 00:16 IST