Mike Procter has died at the age of 77 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेट विश्वात शांतता आहे. चाहते राजकोट कसोटीचा आनंद लुटत असताना महान अष्टपैलू खेळाडू माइक प्रॉक्टरने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या माजी क्रिकेटपटूने आपल्या कामगिरीने दक्षिण आफ्रिकेला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. एक खेळाडू असण्यासोबतच ते अनेक भूमिकांमध्येही दिसले. ते प्रशिक्षकही राहिले होते, याशिवाय त्यांनी मॅच रेफ्रीची भूमिकाही पार पाडली होती, मात्र आता या दिग्गज खेळाडूने वयाच्या ७७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बजावली महत्त्वाची भूमिका –

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू माइक प्रॉक्टरला हृदयविकाराचा त्रास होता. त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही आणि माजी क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला. प्रॉक्टरची पत्नी मरिना यांनी स्वतः शनिवारी रात्री उशिरा या वृत्ताला दुजोरा दिला. या खेळाडूची कारकीर्द फार काळ टिकली नाही, तरीही त्याला महान क्रिकेटर म्हटले जाते.

IND vs USA : क्रिकेटच्या पटलावर भारतच महासत्ता; अमेरिकेचं आव्हान पार करत सुपर ८ मध्ये आगेकूच
IND vs USA Match Updates in Marathi
IND vs USA : भारताविरूद्धच्या सामन्यातून अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलचं बाहेर, समोर आले महत्त्वाचे कारण
Gerhard Erasmus Took 17 Balls to Scored 1 Run Unwanted Record in History of T20 Cricket
ऑस्ट्रेलियामुळे ‘या’ संघाच्या कर्णधाराच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला हा प्रकार
Rohit Sharma Statement on India win Over Pakistan
IND vs PAK: “जर आपण ऑलआऊट होऊ शकतो, तर…” रोहितचा मास्टरस्ट्रोक अन् भारताचा विजय, सामन्यानंतर सांगितलं मैदानात काय घडलं?
Pat Cummins triggers Virat Kohli fans as 'jobless' video surfaces online: 'Say anything about him and watch out'
VIDEO : विराट कोहलीच्या चाहत्यांवर पॅट कमिन्स संतापला; म्हणाला, “सर्वच्या सर्व चाहते…”
Ruben Trumplemann Creates Unique record in History of T20I
T20 WC 2024: नामिबियाच्या खेळाडूने रचला इतिहास, टी-२० मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
Harmeet Singh India U19 Cricketer to USA Cricket Team Player Journey
T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द
Brett Lee on Jasprit Bumrah
T20 WC 2024 : ‘जसप्रीत बुमराह बर्फातही गोलंदाजी करू शकतो’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

१९७०-८० चा काळ दक्षिण आफ्रिका देशासाठी चांगला नव्हता. देशात अनेक प्रकारच्या समस्या होत्या. असे असतानाही या खेळाडूने आपल्या कामगिरीने जगाला चकित केले. प्रॉक्टरने आपल्या कारकिर्दीत एकूण ७ कसोटी सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले गेले आहेत.

हेही वाचा – IL T20 2024 Final : निकोलस पूरनच्या वादळी खेळीच्या जोरावर एमआय एमिरेट्सने पटकावली ट्रॉफी, दुबईचा ४५ धावांनी धुव्वा

माइक प्रॉक्टरची क्रिकेट कारकीर्द –

माइक प्रॉक्टरने या ७ कसोटी सामन्यांमध्ये १५.०२ च्या सरासरीने ४१ विकेट घेतल्या. माइकचा सहभाग असलेल्या ७ कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकही सामना गमावला नाही. या ७ सामन्यांपैकी ६ सामने दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होते, तर एक सामना अनिर्णित राहिला. दक्षिण आफ्रिकेने १९६९-७० मध्ये ऑस्ट्रेलियाचा ४-० ने पराभव केला होता. या मालिकेत प्रॉक्टरने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच कारणामुळे २००७ च्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट झाले. २००२ ते २००८ दरम्यान या खेळाडूने सामनाधिकारी म्हणून भूमिका बजावली होती.