एपी, सिल्व्हरस्टोन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेरची फेरी पूर्ण करायची असताना कारचा टायर पंक्चर होऊनही मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टन याने ब्रिटिश ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या जेतेपदावर नाव कोरले. त्याचे हे कारकिर्दीतील ८७वे तर ब्रिटिश ग्रां. प्रि.चे सातवे विजेतेपद ठरले.

५२ फे ऱ्यांच्या (लॅप) या शर्यतीत हॅमिल्टन आणि त्याचा सहकारी वाल्टेरी बोट्टास आघाडीवर होते. पण ५०व्या लॅपदरम्यान बोट्टासच्या कारचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरून त्याची थेट ११व्या स्थानी घसरण झाली. अर्धा लॅप शिल्लक असताना हॅमिल्टनच्या कारचाही टायर पंक्चर झाला. पण रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेनला अवघ्या सहा सेकं दांनी मागे टाकत हॅमिल्टनने बाजी मारली. या विजेतेपदासह जगज्जेतेपदाच्या शर्यतीत ८८ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. बोट्टास ५८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

फे रारीचा चार्ल्स लेकलेर्क  तिसरा तर रेनॉचा डॅनियल रिकार्डियो चौथा आला. मॅकलॅरेनच्या लँडो नॉरिसने पाचवे स्थान पटकावले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lewis hamilton wins record seventh british grand prix zws
First published on: 03-08-2020 at 01:58 IST