शुक्रवारी किंग्स इलेव्हनविरूध्द दोनशेपेक्षा जास्त रन्सचाच डोंगर उभारणाऱ्या हैदराबादची आजही त्याच दिशेने वाटचाल केली. त्यांनी २० ओव्हर्समध्ये २०९ रन्सचा डोंगर उभा केला. यावेळी त्यांना फक्त तीन विकेट्स गमवाव्या लागल्या. २० ओव्हर्समध्ये २१० रन्स करायचं आव्हान कोलकात्याला पेलवलं नाही आणि त्यांना ४८ रन्सने पराभव पत्करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनरायझर्सना एवढी प्रचंड धावसंख्या उभारता आली ती डेव्हिड वाॅर्नरच्या धमाकेदार शतकामुळे त्याने मॅचच्या सुरूवातीपासूनचरक प्रचंड हाणामारी केली आणि फक्त ४३ बाॅल्समध्टये आपलं शतक पूर्ण केलं

ही मॅच तुल्यबळ असणार असल्याचा अंदाज होता पण सनरायझर्सनी प्रचंड धावंसंख्या उभारल्याने मॅचचं पारडं त्यांच्या बाजूने झुकलं.

सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरोधात जबरदस्त कामगिरी केल्याने त्यांचं मनोधैर्य कमालीचं उंचावलेलं होतं. तसंच हैदराबादचा भुवनेश्वर कुमार या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स मिळवत पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. भुवनेश्वर कुुमारसारखाच अफगाणिस्तानचा युवा लेगस्पिनर रशिद खानसुध्दा या स्पर्धेत चांगली छाप पाडतो आहे. भुवनेश्वर कुमार आणि रशिद खान ही जोडगोळीस विरोधी टीम्ससाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे.

दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा संघही फाॅर्मात आहे पण आजच्या मॅचमध्ये त्यांना छाप पाडता आली नाही. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या टीमने आता १० मॅचेसपैकी ७ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. गौतम गंभीर , राॅबिन उथप्पा, सुनील नरीन तसंच मनीष पांडे हे एकाहून एक बॅट्समन कोलकाताकडे आहेत. तसंच कोल्टर-नाईल, उमेश यादव, मनदीप यादव असा बाॅलर्सचा तोफखानाही त्यांच्याकडे असल्याने ही मॅच तुल्यबळ होण्याची पूर्ण शक्यता आहे. पण आजच्या मॅचमध्ये सनरायझर्स कोलकात्याला भारी पडले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live cricket score ipl 2017 updates sunrisers hyderabad vs kolkata knight riders srh vs kkr
First published on: 30-04-2017 at 19:31 IST