भारताच्या आर प्रज्ञानंदने सुपरबेट जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनवर मात केली. यासह कार्लसन गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्यापासून दूर राहिला. प्रज्ञानंदविरूद्घच्या या खेळाचा कार्लसनवर किती खोल परिणाम झाला हे त्याने स्वत या लढतीनंतर सांगितले.
कार्लसनचा प्रज्ञानंदने पराभव केल्यानंतरही तो तिसऱ्या स्थानी राहिला आहे. कार्लसन आता १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर चीनचा वे यी अग्रस्थानी असून कार्लसनच्या पराभवानंतर त्याची आघाडी २.५ गुणांनी वाढली आहे. रविवार हा ग्रँड चेस टूर सुपरबेट जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचा वॉर्सा लेगचा शेवटचा दिवस होता.
हेही वाचा- IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
कार्लसनने ११व्या फेरीत प्रज्ञानंदविरुद्धच्या लढतीबद्दल खुलासा करताना सांगितले, “मी आज थोडा कमी पडलो. मी सुरूवात चांगली केली होती. खेळ थोडा पुढे गेल्यावर माझं डोकं बधीर झालं होतं त्यामुळे मी गडबडलो. माझा स्कोअर अजूनही चांगला आहे. मात्र वे यी चांगला खेळत राहिला तर माझ्या त्या स्कोअरने काही फरक पडणार नाही.,” कार्लसनने लढतीच्या चार तासांनंतर ग्रँडमास्टर क्रिस्टियन चिरिलाला सांगितले.
उझ्बेकच्या जीएम नोदिरबेक अब्दुसत्तोरोव विरुद्ध दुसऱ्या गेममध्ये कार्लसेनची निराशा आणि चिडचिड अगदी स्पष्टपणे दिसून आली. अब्दुसत्तोरोव विरुद्धच्या सामन्यात विजयी मार्गावर असताना कार्लसन वेळेच्या अडचणीत सापडला आणि त्याने आपल्या चूक केली. शेवटी त्याने आपल्या सीटवरच उडी मारली आणि निराशेने हवेत हात भिरकावताना दिसला. “मी काही सेकंदांसाठी सुन्न पडलो होतो,” असेही कार्लसनने नंतर कबूल केले.
हेही वाचा – प्रज्ञानंदची कार्लसनवर मात; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी; वे यी आघाडीवर
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्लसनवर विजय मिळवल्यानंतर प्रज्ञानंदलाही पराभवांचा सामना करावा लागला. हा १८वर्षीय भारतीय खेळाडू तिसऱ्या स्थानावर असलेल्या कार्लसनच्या केवळ एका गुणाने मागे होता, परंतु जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला पराभूत केल्यानंतर त्याने पुढील दोन लढती गमावल्या.