ऑलिम्पिकपटू नरसिंग यादव, दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह सहाशेहून अधिक मल्ल भोसरी येथे रविवारपासून सुरू होणाऱ्या ५७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे भोसरी येथे चार दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा गादी व माती विभागात होणार असून दोन्ही विभागाकरिता ५५, ६०, ६६, ७४, ८४, ९६ किलो व महाराष्ट्र केसरी असे गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेत सर्व जिल्हे व शहर तालीम अशा ४४ संघांचे खेळाडू सहभागी होत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, नंदू आबदार, महेश वरुटे, महादेव सरगर, सचिन मोहोळ, राहुल सणस, योगेश पवार यांचाही समावेश आहे. खेळाडूंची वजने शनिवारी व रविवारी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत होणार आहेत.
‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठीची लढत ४ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवर होणार आहे. हा किताब जिंकणाऱ्यास चांदीची गदा दिली जाणार आहे. स्पर्धेनिमित्त राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे राज्य स्तरावर पंच उजळणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kesari wrestling competition starts from sunday
First published on: 30-11-2013 at 12:54 IST