scorecardresearch

मुंबई क्लासिक शरीरसौष्ठव ; पुण्याच्या महेंद्र चव्हाणला जेतेपद

महेंद्रने मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंचे आव्हान मोडीत काढत या किताबावर आपले नाव कोरले.

मुंबई : ‘भारत श्री’ सागर कातुर्डे आणि सुजन पिळणकर या नामांकित मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंच्या अनुपस्थितीत पुण्याच्या महेंद्र चव्हाणने मुंबई क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

महेंद्रने मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंचे आव्हान मोडीत काढत या किताबावर आपले नाव कोरले. संदीप सावळे या स्पर्धेत उपविजेता ठरला.

जुलै महिन्यात होणाऱ्या आशिया श्री स्पर्धेसाठी येत्या २२ मे रोजी हिमाचल प्रदेशात भारतीय संघाची निवड चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी महेंद्र चव्हाण, संदीप सावळेसह गणेश पेडामकर, अवधूत निगडे, रामा मायनाक, तौसिफ मोमीन, भास्कर कांबळी, आशीष लोखंडे, सुशांत रांजणकर आणि निलेश दगडे यांची निवड झाली आहे.

स्पर्धेचा निकाल

५५ किलो : १. अवधूत निगडे,

२. नितीन शिगवण, ३. विनोद पोतदार

६० किलो : १. रामा मायनाक,

२. मोहसिन शेख, ३. बाळू काटे

६५ किलो : १. सुरज सूर्यवंशी,

२. किशोर गोळे, ३. हर्षद मांडवकर

७० किलो : १. संदीप सावळे,

२. अमित पाटील, ३. विनायक लोखंडे

७५ किलो : १. तौसिफ मोमीन,

२. सलीम सय्यद, ३. संजय इल्हे

८० किलो : १. गणेश पेडामकर,

२. भास्कर कांबळी, ३. संदेश नागदेव

८० किलोवरील : १. महेंद्र चव्हाण,

२. सुशांत रांजणकर, ३. निलेश दगडे

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahendra chavan won the mumbai classic state level bodybuilding championship zws

ताज्या बातम्या