लिसेस्टर सिटीवर १-० अशी मात
प्रीमियर लीग फुटबॉल
उत्तरार्धात कर्णधार व्हिन्सेंट कोम्पनीने केलेल्या एकमेव गोलमुळे मँचेस्टर सिटीने लिसेस्टर सिटीवर १-० अशी मात केली. या विजयामुळे मँचेस्टर सिटी हा प्रीमियर लीग विजेतेपदापासून केवळ एक विजयाच्या अंतरावर पोहोचला आहे.
सामना संपण्यास २० मिनिटे बाकी असताना कोम्पनीने दुरून साकारलेला अफलातून एकमेव गोल निर्णायक ठरला. ब्रायटनला होणाऱ्या सामन्यात विजय किंवा बरोबरी साधल्यासदेखील विजेतेपदाला गवसणी घालू शकतात. कोम्पनीने या विजयानंतर अश्रूपूर्ण नेत्रांनी मैदान सोडले. त्याचा करार संपुष्टात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशिक्षक पेप गुआर्डिओलो आणि संघ सहकाऱ्यांनी कोम्पनीसह त्याच्या कुटुंबाला मानवंदना दिली.