फॉम्र्युला-वन शर्यतीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी रेड बुल संघाचा जर्मनीचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेलला फक्त एका विजेतेपदाची आवश्यकता आहे. पण त्याचबरोबर फेरारीचा फर्नाडो अलोन्सो आठव्यापेक्षा खालच्या क्रमांकावर यायला हवा. तसे झाल्यास, वेटेलचे विश्वविजेतेपद निश्चित होईल. अन्यथा, २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत विश्वविजेतेपदाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
रविवारी सुझुका येथे होणाऱ्या जपान ग्रां. प्रि. शर्यतीसाठी रेड बुलच्या मार्क वेबरने पात्रता शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. गाडीत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वेटेलला पोल पोझिशन मिळू शकली नाही.