Marry Kom Confirms Divorce: भारताची सर्वात यशस्वी बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम सर्वांच्या परिचयाची आहे. आठ वेळा विश्वविजेती आणि पद्मभूषण पुरस्कार विजेती मेरी कोमने तिच्या बॉक्सिंग कारकिर्दीतून देशाचे नाव उंचावले आहे. गेल्या काही काळापासून मेरी कोम चर्चेत आहे. परंतु, यावेळी ती तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नव्हे तर तिच्या खासगी आयुष्यातील एका निर्णयामुळे चर्चेत आली आहे.

मेरी कोम आणि तिचा पती करूंग ओन्खोलर कोम (ऑन्लर) हे आता एकत्र राहत नाहीत. ते २०२२ पासून वेगळे राहत असल्याच्या बातम्या येत होत्या. असे म्हटले जात आहे की दोघांमध्ये बराच काळ मतभेद होते आणि आता हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. तर मेरी कोमने आता घटस्फोट घेतले असल्याचे स्वत: कबुल केले आहे.

मेरी कोमने तिच्या वकिलाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली की ती आणि तिचा पती करूंग ओन्खोलोरचा २० डिसेंबर २०२३ला कायदेशीर घटस्फोट झाला आहे. मेरी कोम आणि तिचा सहकारी हितेश चौधरी यांच्यातील संबंधांच्या वाढत्या अफवा आणि ऑनलाइन चर्चांदरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे.

मेरी कोमच्या अधिकृत निवेदनामध्ये तिने अफेअरबाबत नकार दिला आहे. या दाव्यांचे खंडन करताना, मेरी कोमने कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे म्हटले आहे. मेरीने स्पष्ट केले की ओन्खोलर आणि ती दोघांच्या सहमतीने वेगळे झाले आहेत आणि ते जवळजवळ दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत….

निवेदनात म्हटले आहे की, या चर्चा आणि चुकीच्या मीडिया रिपोर्ट्सच्या पार्श्वभूमीवर, मी खालील स्पष्टीकरण देऊ इच्छितो: “एमसी मेरी कोम आणि ओन्खोलर (ओनलर) कोम आता विवाहित नाहीत. त्यांनी २० डिसेंबर २०२३ रोजी दोन्ही कुटुंबातील सदस्यांच्या आणि निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत KOM प्रथा कायद्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हितेश चौधरीबाबतच्या अफेयरच्या अफवांवर मेरी कोमच्या निवेदनात म्हटले, “माझ्या क्लायंटचे हितेश चौधरी किंवा इतर कोणाशीही प्रेमसंबंध असल्याच्या अफवा स्पष्टपणे नाकारल्या जातात आणि कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मने यासंबंधित माहिती देऊ नये,” असे निवेदनात म्हटले आहे.