scorecardresearch

मासा आघाडीवर.. फेरारी सुसाट!

येत्या रविवारी होणाऱ्या बहरिन ग्रां. प्रि.स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर आयोजित सराव शर्यतीत फेरारीच्या फेलिप मासाने आपला सहकारी फर्नाडो अलोन्सोला मागे टाकत अव्वल स्थान राखले. साखिर सर्किटवरच्या ४१ अंश सेल्सियस तापमानात मासाने सराव सत्राच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी मिळवली.

मासा आघाडीवर.. फेरारी सुसाट!

येत्या रविवारी होणाऱ्या बहरिन ग्रां. प्रि.स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर आयोजित सराव शर्यतीत फेरारीच्या फेलिप मासाने आपला सहकारी फर्नाडो अलोन्सोला मागे टाकत अव्वल स्थान राखले. साखिर सर्किटवरच्या ४१ अंश सेल्सियस तापमानात मासाने सराव सत्राच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी मिळवली. आठवडाभरापूर्वी झालेल्या चायनीज ग्रां. प्रि. शर्यतीत अलोन्सोने अव्वल स्थान पटकावले होते. या विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या फेरारीच्या संघाने वेग आणि कौशल्य दोन्हींमध्ये आपली ताकद पेश करत सराव शर्यतीत अग्रस्थान राखले. जर्मनीच्या मर्सिडिझ बेन्झ संघाच्या निको रोसबर्गने तिसरे स्थान मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-04-2013 at 04:04 IST
ताज्या बातम्या