क्रिकेट मैदानात खेळाडूं इतकाच भाव खाऊन जातात त्या टी.व्ही. शो होस्ट करणाऱ्या महिला अँकर. एक काळ मंदिरा बेदीने क्रिकेट सामन्यांआधी होणाऱ्या शो आणि चर्चांचं अँकरिंग करुन आपली छाप उमटवली होती. ती जागा आता घेतली आहे मयंती लँगरने. मयंती लँगर क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे.
सध्या मयंती आपला पती स्टुअर्ट बिन्नीसोबत व्हिएतनाममध्ये सुट्टीचा आनंद उपभोगते आहे. स्टुअर्ट बिन्नीने या ट्रीपचे काही खास फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात दोघेही जण आपल्याला मिळालेला वेळ एन्जॉय करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा



स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या शोच्या अँकरिंगची जबाबदारी ही मयंतीकडे असते. या अँकरिंगमुळे अनेक जण तिचे चाहते झाले होते. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली होती. सोशल मीडियावर मयंतीला फॉलो करणाऱ्यांमध्ये इतकी वाढ झाली की तिच्या ड्रेसिंग स्टाईल, हेअर स्टाईल यावरही लोकांनी तिला कधीकधी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळा मयंतीने आपली समयसुचकता दाखवत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यामुळे मयंती लँगरचं हे सुट्टीचं सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चांगलच गाजताना दिसतंय.

गेले काही वर्ष स्टुअर्ट बिन्नी आंतराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करुनही स्टुअर्टला संघात स्थान मिळवता आलेलं नाहीये. मधल्या फळीत फलंदाजीसोबत गोलंदाजी करण्याचं कसबही स्टुअर्ट बिन्नीकडे आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे वन-डे सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची आकडेवारी ही बिन्नीच्याच नावावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayanti langer exclusive photos from her vietnam trip with her husband stuart binny
First published on: 28-06-2017 at 18:59 IST