अमेरिकेत सुरू असलेल्या कोन्काकॅफ गोल्ड कप स्पर्धेच्या एका सामन्यात धक्कादायक घटना घडली आहे. कतार विरुद्ध मेक्सिको या सामन्यादरम्यान, मेक्सिकोच्या एका चाहत्यावर चाकूहल्ला झाला आहे. गोल्ड कप स्पर्धेदरम्यान स्टँड्समध्ये बसलेल्या चाहत्यांमध्ये मोठा राडा सुरू झाला. त्याचवेळी एका चाहत्यावर चाकूहल्ला झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. मेक्सिकोच्या चाहत्याच्या छातीवर वार झाला आहे. या हल्यानंतर तो रक्तबंबाळ झाला होता. तसेच हल्ला करून हल्लेखोर स्टेडियममधून पसार झाला. पोलीस आणि स्टेडियममधील सुरक्षा यंत्रणा त्याला पकडू शकली नाही.

कॅलिफोर्नियाच्या सँटा क्लारा येथील लेव्हीज स्टेडियममध्ये हा सामना सुरू होता. या सामन्यात कतारने मेक्सिकोवर १-० अशी मात केली. त्यानंतर स्टँड्समध्ये बसलेल्या चाहत्यांमध्ये मोठा राडा झाला. यावेळी १५ हून अधिक चाहते भिडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला

दोन्ही संघांच्या चाहत्यांमधील हा राडा इतर प्रेक्षकांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रीत केला असून या हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की एक माणूस दुसऱ्या व्यक्तीवर चाकूने हल्ला करतोय. तसेच ज्या व्यक्तीवर चाकूहल्ला झाला त्याच्या छातीतून रक्त ओघळताना दिसत आहे. या जखमी व्यक्तिची प्रकृती चिंताजनक होती. परंतु, उपचारांनंतर आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

डेली मेलने प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चाहत्यांमधील ही हाणामारी जवळपास १० मिनिटं चालली. मेक्सिकोच्या चाहत्यावर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर त्याने अंगातल्या जर्सीच्या सहाय्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही. सीसीटीव्ही फूटेज आणि इतर चाहत्यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओच्या आधारे पोलीस हल्लोखोराची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा >> Praveen Kumar Accident: माजी गोलंदाज प्रवीण कुमारच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची धडक, मुलासह थोडक्यात बचावला

चाहत्यांच्या गटावर चाकूहल्ला करणार्‍या व्यक्तीचे वर्णन प्रत्यक्षदर्शींनी केलं आहे. त्यानुसार हल्लेखोराचे वय २५ ते ३५ वर्ष इतकं असावं. त्याचे केस काळेभोर आणि लहान होते. तसेच त्याने खुरटी दाढी ठेवली होती. तसेच बारीक मिशाही होत्या. चाहत्यांवर चाकूहल्ला करून तो स्टेडियममधून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.