मिचेल प्लॅटिनी यांची युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युईएफए) अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आह़े  मंगळवारी झालेल्या निवडणुकीत प्लॅटिनी यांनी तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळवला़  फ्रान्सचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू प्लॅटिनी यांनी पहिल्यांदा २००७ मध्ये युईएफएच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती़  मंगळवारच्या निवडणुकीत ५४ देशांच्या प्रतिनिधींनी त्यांची बिनविरोध निवड करून त्यांच्याकडे आणखी चार वष्रे सूत्र दिली़  या निवडीमुळे फिफाच्या उपाध्यक्षपदावर पुढील चार वर्ष प्लॅटिनीच राहतील हेही निश्चित झाले आह़े