Mitchell Starc gifted his boots to a young cricket fan : मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात कांगारू संघाने शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ७९ धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक अशी कृती केली, ज्यामुळे त्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्यादरम्यान लंच ब्रेक होता आणि मिचेल स्टार्क थेट स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या छोट्या चाहत्यांकडे गेला. यादरम्यान मिचेल स्टार्कने चाहत्यांना दिलेले वचन पूर्ण केले. मिचेल स्टार्कने त्याच्या छोट्या चाहत्याला शूज गिफ्ट केले. त्तत्पूर्वी स्टार्कने छोट्या चाहत्याला वचन दिले होते की, जर ऑस्ट्रेलियाने आज सर्व १० विकेट घेतल्या, तर तो लंच ब्रेकमध्ये त्याला एक खास भेट वस्ती देईल. त्यानुसार मिचेल स्टार्कने छोट्या चाहत्याला दिलेला शब्द पाळला.ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शूज गिफ्ट केल्यानंतर मिचेल स्टार्कने त्याच्या छोट्या फॅनसोबत सेल्फीही काढला.

या सामन्यात स्टार्कने केली शानदार गोलंदाजी –

दुसऱ्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कने अप्रतिम गोलंदाजी केली. स्टार्कला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नसली तरी दुसऱ्या डावात स्टार्कने ४ विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात स्टार्कने १३.२ षटके टाकली आणि यादरम्यान त्याने ५५ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात पाकिस्तानला २३७ धावांत ऑलआउट केले. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३१६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २६२ धावा केल्या होत्या. यानंतर कांगारू संघाकडे ३१६ धावांची आघाडी होती.

हेही वाचा – IND vs SA Test : ‘तो लहान मुलगा नाही…’, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शार्दुल ठाकुरवर संतापले रवी शास्त्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी आपली छाप सोडली –

मेलबर्न कसोटीत पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांची कामगिरी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्याच्या दोन्ही डावात एकूण २० विकेट्स घेतल्या. संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. अशा स्थितीत कमिन्सने दोन्ही डावात एकूण १० विकेट घेतल्या. या चमकदार कामगिरीमुळे पॅट कमिन्सला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.