scorecardresearch

Premium

विश्वचषकावर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्श विरुद्ध एफआयआर! मोदींनाही धाडलं पत्र, ऑस्ट्रेलियाच्या स्टारला भारतात बंदी?

Mitchell Marsh Photo: विश्वचषक अपात्र संघाच्या हाती पडल्यावर हा असा अपमान होणे साहजिकच आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती, अलीकडेच मोहम्मद शमीने सुद्धा मार्शच्या या फोटोबाबत निराशा व्यक्त केली.

Mitchell Marsh Restricted In India Demands activist Narendra Modi Letter FIR against Australian all-rounder For Feet On WC Trophy
मिशेल मार्श विरुद्ध FIR (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mitchell Marsh FIR Lodged: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं आणि मग ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधला एक फोटो प्रचंड चर्चेत आला. हा फोटो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला होता पण यावरून नंतर वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. तुमच्याही लक्षात आले असेल, हे प्रकरण म्हणजे मिशेल मार्शने विश्वचषकावर पाय ठेवून हातात बिअर घेत काढलेला फोटो. विश्वचषक अपात्र संघाच्या हाती पडल्यावर हा असा अपमान होणे साहजिकच आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती, अलीकडेच मोहम्मद शमीने सुद्धा मार्शच्या या फोटोबाबत निराशा व्यक्त केली. पण आता मिशेल मार्शच्या या फोटोमुळे भारतात चक्क एक एफआयआर नोंदवण्यात आल्याचे समजतेय.

अलिगढमधील एका आरटीआय कार्यकर्त्याने मिशेलच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या खेळाडूला भारतात खेळण्यास बंदी घालण्याची विनंती केली आहे. आरटीआय कार्यकर्ते पंडित केशव यांनी ही तक्रार दाखल केली असून मार्शने वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या कृतीमुळे भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. प्राप्त माहितीनुसार केशव यांनी तक्रारीची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवली आहे.

Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग
All people think Rohit Sharma's bitter sweet DRS affair continues commentators left in splits
VIDEO : ‘काही सेकंद बाकी, सर्वांनी डोकं लावा…’, डीआरएसबाबत रोहित शर्मा गोंधळला, शेवटच्या क्षणी घेतला निर्णय
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
MS Dhoni jersey number
“त्या दिवशी आई-वडिलांनी…”, धोनीने सांगितलं ७ नंबरची जर्सी का निवडली? चाहत्यांकडून ‘Thala for a reason’चा ट्रेंड

मिशेल मार्श विरुद्ध FIR

हे ही वाचा<< “ऑस्ट्रेलियाने फसवलं, मिड इनिंगला..”, आर.आश्विनचा थक्क करणारा खुलासा! म्हणाला, “त्यांच्या मुख्य निवडकर्त्यांनी..”

दरम्यान, मार्शने या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विजेतेपद जिंकल्यानंतर मार्श संघासह ऑस्ट्रेलियाला परतला आहे. दुसरीकडे, २३ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने नवा टी २० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या ८० आणि इशान किशन ५८ धावांच्या झंझावाती खेळीमुळे शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mitchell marsh restricted in india demands activist narendra modi letter fir against australian all rounder for feet on wc trophy svs

First published on: 24-11-2023 at 18:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×