Women’s T20 World Cup 2020 Ind vs Eng : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. यासह भारतीय महिला संघाने सामना न खेळूनही एक इतिहास रचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

T20 World Cup : ‘सामना खेळू न देताच वर्ल्ड कपमधून बाहेर कसं काढता?’

भारतीय संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला. त्यामुळे सर्व स्तरातून भारतीय संघाला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. तशातच भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने आगळ्यावेगळ्या ढंगात संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मितालीने चक्क साडी नेसून क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ बनवला आहे. त्या माध्यमातून तिने भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. “आता जगाला दाखवून द्या की तुम्हीदेखील ‘हे’ करू शकता. कम ऑन इंडिया! विश्वचषक जिंकूनच मायदेशात परत या”, असा संदेश तिने व्हिडीओतून दिला. त्याच व्हिडीओत मितालीने महिला दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

T20 World Cup : सामना न खेळूनही टीम इंडियाने घडवला इतिहास

WT20 World Cup 2020 IND vs ENG : पावसाने काढली इंग्लंडची विकेट; भारत प्रथमच अंतिम फेरीत

भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार म्हणून मोठ्या संख्येने चाहतावर्ग सामन्यासाठी उपस्थित होता. भारताने साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीचे तिकीट पटकावणारा भारत स्पर्धेतील पहिला संघ ठरला होता. याऊलट इंग्लंडला साखळी फेरीत एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण इतर सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली. तशातच यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघ अजिंक्य होता, पण इंग्लंडने २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ तसेच २०१८च्या विश्वचषकात भारताला हरवले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत कोणता संघ वरचढ ठरतो? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण अखेर पावसामुळे सामना होऊ शकला नाही आणि इंग्लंडच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithali plays cricket in saree to wish team india for womens t20 world cup 2020 final watch video vjb
First published on: 05-03-2020 at 14:10 IST