Asia Cup2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यात आशिया चषक २०२३ वरून गेल्या काही काळापासून वाद सुरू आहेत. पाकिस्तान आशिया चषकाचे यजमानपद भूषवत असून टीम इंडिया तेथे जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत, पीसीबीने एक हायब्रीड मॉडेल प्रस्तावित केले, ज्या अंतर्गत भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील तर इतर संघ पाकिस्तानमध्ये खेळतील. मात्र, बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारलेला आहे.

आशिया चषक २०२३च्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात जवळपास सहा महिन्यांपासून वाकयुद्ध सुरू होते, जे आता संपले आहे. पण तरीही पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू भारतीय बोर्डाविरोधात संतापजनक वक्तव्य करत आहेत. या यादीत माजी खेळाडू मोहम्मद आमिरचेही नाव जोडले गेले आहे. ज्याने अलीकडेच भारतीय क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली आणि जय शाह यांच्यावर देखील तोंडसुख घेतले.

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Shubman Gill Future India Captain, Suresh Raina Claims
IPL 2024 : हार्दिक किंवा पंत नव्हे, तर ‘हा’ २४ वर्षीय खेळाडू असू शकतो भारताचा भावी कर्णधार, ‘मिस्टर आयपीएल’चे वक्तव्य
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावर जय शाहवर टीका होत आहे

खरे तर, गेल्या वर्षी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाला आशिया चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर अनेक महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये मैदानावरून वाद सुरू होता. त्याच वेळी, आशिया क्रिकेट परिषद आशिया कप २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याच्या विचारात आहे. मात्र, आता हे प्रकरण मिटले असून पाकिस्तानला यजमानपदासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र असे असूनही पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद आमीरने बीसीसीआयला टोमणा मारला आहे.

हेही वाचा: Ashes 2023: भारताविरुद्ध जबरदस्त कामगिरी करणाऱ्या स्कॉट बोलंडची इंग्लंडच्या माजी खेळाडूने उडवली खिल्ली; म्हणाले, “तो फिरकीपटू…”

मोहम्मद आमीरने बीसीसीआय टोला जय शाह यांना टोला लगावला

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान एक विधान देताना मोहम्मद आमीरने बीसीसीआयच्या वागणुकीची तुलना सूचनांविरुद्ध तक्रार करणाऱ्या शाळेतील लहान मुलाशी केली. पुढे त्याने बीसीसीआय आणि जय शाह यांची खिल्ली उडवली. तो म्हणाला, “पीसीबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. याचा अर्थ पाकिस्तान क्रिकेटला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. इतर क्रिकेट बोर्ड किंवा पाकिस्तान बोर्ड काही फरक पडत नाही हे बीसीसीआय पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना सांगायचे आहे की तुम्ही काहीही करा, आम्हाला त्याची पर्वा नाही.”

पुढे आमीर म्हणाला की, “हे म्हणजे असे आहे की तुम्ही एखाद्या मुलाला चॉकलेट खाऊ नका असे सांगितले आणि तो ते करतच राहिला. बीसीसीआयचा जगात शब्द चालतो कारण ते एक श्रीमंत बोर्ड आहे, असे असूनही १० वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. पीसीबीचा केलेला हा अपमान आम्ही सहन करणार नाही. यातून तुम्ही बालिश आहात हे दिसते.” अशी खरमरीत टीका त्याने केली.

हेही वाचा: Babar Azam: Virat Vs Babar: “बाबर आझम विराट कोहलीला मागे टाकणार”, इम्रान खानने का केला हा दावा? जाणून घ्या

मुलांसारखा आग्रह न धरता क्रिकेट होऊ द्या : मोहम्मद आमिर

या प्रकरणाला पुढे नेत मोहम्मद आमिर म्हणाला की, “क्रिकेट कुठेही असो, कोणत्याही अटींशिवाय होऊ द्या.” माजी खेळाडू म्हणाला, “आम्हाला फक्त एका गोष्टीची काळजी आहे आणि ती म्हणजे क्रिकेट. पाकिस्तान असो, भारत असो, अफगाणिस्तान असो, श्रीलंका असो वा बांगलादेश, लहान मुलांप्रमाणे अनावश्यक हट्टीपणा न करता शांततेने हे सर्व पार पडू द्या. चार दिवसांपूर्वी आयसीसीची टीम येथे आली होती. सुरक्षेबाबत काही अडचण आली असती तर ते कळले असते. नॅशनल क्रिकेट अकादमीतही मी तिथे उपस्थित होतो. पीसीबीने त्यांना चांगला पाहुणचार दिला.

विशेष म्हणजे आशिया क्रिकेट परिषद लवकरच आशिया कप २०२३ चे वेळापत्रक जाहीर करणार आहे. पण २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तानमध्ये सामने खेळवले जातील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, भारतीय संघासोबत सामन्यांचे यजमानपद श्रीलंका करणार आहे.