भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत लक्षवेधक कामगिरी करत मोहम्मद सिराजने सर्वांची मनं जिंकली. ओव्हल कसोटीतील मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. यासह भारत आणि इंग्लंड मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली आहे. मोहम्मद सिराजने या सामन्यात आत्मविश्वासाच्या बळावर उत्कृष्ट कामगिरी केली. पण सिराजच्या उत्कृष्ट कामगिरीत त्याचं मनोबल वाढवण्यासाठी संघातील सहकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे.

मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ पाचव्या दिवशी ३५ धावाही करू शकला नाही. भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात हॅरी ब्रूक आणि जो रूटच्या शतकांच्या आणि १९५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर चांगली झुंज दिली. पण अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी बाजी मारली.

मोहम्मद सिराजने ओव्हल कसोटीच्या अखेरच्या दिवशी सकाळी उठल्यावर Believe नाव असलेलं वॉलपेपर डाऊनलोड केलं आणि तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो, असं त्याने मनात ठरवलं. पण त्याने सामन्यानंतर जडेजाने त्याला गोलंदाजीदरम्यान काय सांगितलं, याचा खुलासा केला.

मोहम्मद सिराज मॅचविनिंग कामगिरीनंतर काय म्हणाला?

मोहम्मद सिराज म्हणाला, “मी खूप आनंदी आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत खूप मेहनत घेतली. माझी रणनिती एकच होती की चेंडू योग्य लाईनवर टाकायचे आणि दबाव निर्माण करावा. त्यानंतर जे काही झालं ते बोनस होतं.” त्याच्या शानदार कामगिरीसाठी सिराजला ‘सामनावीर’ म्हणून निवडण्यात आले.

सिराज पुढे म्हणाला, “मला नेहमीच स्वतःवर विश्वास असतो. मी कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकून देण्यासाठी कामगिरी करू शकतो. मी गुगलवरून Believe लिहिलेला फोटो डाऊनलोड केला आणि मी स्वत:ला सांगितलं की मी हे करू शकतो. ब्रूकचा झेल मी सोडला, तो सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. मी जर तो झेल टिपला असता तर आज आपण इथे नसतो, सामना कधीच संपला असता. पण ज्यापद्धतीने त्याने फलंदाजी केली, ते कमाल होतं.”

जडेजाने सिराजला नेमकं काय सांगितलं होतं, हे सांगताना तो म्हणाला, “लॉर्ड्सवरील सामना मनाला चटका लावणारा होता. जडेजाने मला सांगितलं तुझ्या गोलंदाजीवर विश्वास ठेव आणि तुझ्या वडिलांचा विचार कर आणि त्यांच्याशी कर. तू किती कष्टाने इथे पोहोचला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचही कसोटी सामने हे ५ दिवस चालल्यानंतर सामन्याचा निकाल मिळाल्याने प्रत्येक सामना रोमांचक झाला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निकाल २-२ असा बरोबरीत राहिला आहे.