‘मंकीगेट’ प्रकरणामुळेच अँड्रय़ु सायमंड्स या गुणवान खेळाडूची क्रिकेट कारकीर्द फुलायच्या अगोदरच संपुष्टात आली, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने येथे सांगितले. २००८ मध्ये भारताचा क्रिकेटपटू हरभजनसिंग याने कसोटी सामन्यात सायमंड्सला जातीय अपशब्द उच्चारल्याचे आरोप करण्यात आले होते.
सायमंड्सला या प्रकरणात अपेक्षेइतके सहकार्य आमच्या क्रिकेट मंडळाकडून लाभले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दबावापुढे क्रिकेट ऑस्ट्रेलिया झुकली.
जर आमच्या क्रिकेट संघटकांनी हे प्रकरण लावून धरले असते तर भारतीय खेळाडूचा खरा चेहरा उघडकीस आला असता व सायमंड्स याची कारकीर्द सुरळीत झाली असती, असे सांगून पॉन्टिंग म्हणाला, ऑस्ट्रेलियाने मला आदेश दिल्याप्रमाणे मी करीत राहिलो. मात्र अन्य काही संघटकांनी भारतीय संघटकांवर दबाव आणला असता, हरभजनवर तीन वर्षांची बंदी आणली गेली. मात्र भारतीय संघटकांनी त्याविरुद्ध अपील करीत त्याची शिक्षा रद्द करण्यात यश मिळविले. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘त्या’ प्रकरणामुळेच सायमंड्सची कारकीर्द संपुष्टात -पॉन्टिंग
‘मंकीगेट’ प्रकरणामुळेच अँड्रय़ु सायमंड्स या गुणवान खेळाडूची क्रिकेट कारकीर्द फुलायच्या अगोदरच संपुष्टात आली, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने येथे सांगितले.
First published on: 14-02-2014 at 03:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monkeygate saga ruined symonds career ponting