फुटबॉल म्हटले की ९० मिनिटांचा थरार डोळ्यासमोर उभा राहतो. चित्त्याला साजेसे खेळाडूंचे पळणे, चेंडू आपल्याकडेच राखण्यासाठी सुरेख पदलालित्य, गोल करण्यासाठी अहमहमिका आणि प्रत्यक्ष गोल झाल्यानंतरचा जल्लोष हे वातावरण फुटबॉलरसिकांच्या अंगवळणी पडलेले. चॅम्पियन्स लीगच्या मंगळवारी झालेल्या लढतीत फुटबॉलप्रेमींना खेळाचा थरार पाहायला मिळाला मात्र गोलचे सुख अनुभवता आलेच नाही. चेल्सी-अॅटलेटिको लढत गोलशून्य बरोबरीत संपल्याने पुढच्या आठवडय़ात याच संघांना एकमेकांविरुद्ध पुरेसा अभ्यास करून उतरावे लागणार आहे. या लढतीच्या निमित्ताने आक्रमण, बचाव, शैली, वेग या सर्वच आघाडय़ांवर सुधारणा आवश्यक असल्याचे दोन्ही संघांच्या लक्षात आले आहे.
सामन्यादरम्यान चेल्सीला दोन जबर धक्के बसले. गोलरक्षक पीटर केच आणि कर्णधार जॉन टेरी हे दोघे दुखापतग्रस्त झाल्याने चेल्सीला आपल्या डावपेचात बदल करावे लागले. फ्रँक लॅम्पार्ड आणि जॉन ओबी मिकेल यांच्यासह अॅटलेटिकोचा कर्णधार गॅबी यांना यलो कार्ड मिळाल्याने त्यांना पुढच्या बुधवारी होणाऱ्या लढतीत खेळता येणार नाही. सामन्याआधी, सामन्यादरम्यान आम्हाला कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. दोन खेळाडूंना यलो कार्ड, दोन खेळाडूंना दुखापती यामुळे आम्ही चार खेळाडूंना गमावले. पुढच्या लढतीत मात्र आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल असे चेल्सीचे व्यवस्थापक जोस मॉरिन्हो यांनी सांगितले.
दोन्ही संघांच्या बचावात्मक धोरणामुळे गोल करण्याच्या संधींवर मर्यादा आल्या. दुखापती आणि यलो कार्डाच्या व्यत्ययामुळे बदली खेळाडूंवर जबाबदारी वाढली. प्रतिस्पध्र्यानी रचलेला बचाव भेदत गोल करण्यात त्यांना अपयश आले. अॅटलेटिकोतर्फे रौल गार्सिआने गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही अयशस्वी ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2014 रोजी प्रकाशित
गोलविरहित..
फुटबॉल म्हटले की ९० मिनिटांचा थरार डोळ्यासमोर उभा राहतो. चित्त्याला साजेसे खेळाडूंचे पळणे, चेंडू आपल्याकडेच राखण्यासाठी सुरेख पदलालित्य, गोल करण्यासाठी अहमहमिका आणि प्रत्यक्ष गोल झाल्यानंतरचा जल्लोष हे वातावरण फुटबॉलरसिकांच्या अंगवळणी पडलेले.
First published on: 24-04-2014 at 06:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mourinho may play weakened chelsea side at liverpool