MS Dhoni’s 43rd birthday celebration video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज ४३ वर्षांचा झाला. महेंद्रसिंग धोनीने मुंबईत मध्यरात्री पत्नीबरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला. यादरम्यान साक्षीने ‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या पायाला स्पर्श करुन त्याचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर साक्षीने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. केक कापताना धोनीच्या एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तो केक कापताना म्हणाला, ‘ये एग-लेस केक है ना.’

महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड अभिनेता सलमान खानही उपस्थित होता. ‘हॅपी बर्थडे कॅप्टन साहब!’ असे कॅप्शन देत सलमान खानने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. धोनी, जो सहसा सोशल मीडियावरील प्रसिद्धीपासून दूर राहतो, त्याने अलीकडेच टी-२० विश्वचषक विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले होते. धोनीच्या आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सनेही हाच व्हिडीओ शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, ‘पार्टी सुरू झाली आहे!’

सुरेश रैनानेही दिल्या शुभेच्छा –

माजी भारतीय फलंदाज आणि धोनीचा चांगला मित्र सुरेश रैनाने एक्वर लिहिले, ‘हॅपी बर्थडे माही भाई! तुमच्या हेलिकॉप्टर शॉटसारखा अप्रतिम आणि तुमच्या स्टंपिंग टॅलेंटइतका चांगला दिवस तुम्हाला जावो. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने २०२३ च्या आयपीएल फायनलमधील एक जुना फोटो शेअर केला आणि लिहले, ‘क्रिकेटमधील माझ्या एकमेव आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माही भाई, तुमची उपस्थिती ही सर्वात मोठी भेट आहे. भरपूर प्रेम.’

हेही वाचा – Team India : अर्शदीप सिंगचे मोहालीत ‘ग्रँड वेलकम’, ढोल-ताशांच्या गजरातील जंगी स्वागताचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमएस धोनीची कामगिरी –

थाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमएस धोनीने भारताला तीन आयसीसी ट्रॉफी आणि चेन्नई सुपर किंग्जला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिली आहेत. धोनीने दीड दशकाच्या कालावधीत ३५० एकदिवसीय सामने खेळले आणि ५०.५८ च्या सरासरीने १०,७७३ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये, त्याने भारतासाठी ९० सामने खेळले आणि ३८.०९ च्या सरासरीने ४७६ धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये ५२४३ धावा केल्या आहेत.