नियम स्पष्ट झाल्यावरच धोनीबाबतचा निर्णय

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने यंदा चौथ्यांदा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले.

Dhoni
(Photo- iplt20.com)

चेन्नई : ‘आयपीएल’च्या पुढील हंगामात महेंद्रसिंह धोनीला कायम ठेवण्याबाबतचा निर्णय सर्व नियम स्पष्ट झाल्यावरच घेण्यात येईल, असे चेन्नई सुपर किंग्जच्या पदाधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

पुढील हंगामात दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार असून खेळाडूंना कायम ठेवण्याबाबतचे नियम अजून ‘बीसीसीआय’ने जाहीर केलेले नाहीत. ‘‘खेळाडूंना संघात कायम ठेवण्याबाबतचे नियम अजून स्पष्ट करण्यात आलेले नाहीत. आम्हाला किती खेळाडूंना संघात कायम राखता येणार हे कळल्यावरच आम्ही पुढील निर्णय घेऊ,’’ असे चेन्नई संघाचा पदाधिकारी म्हणाला. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने यंदा चौथ्यांदा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ms dhoni s retention decision to be taken after the rules will announce zws

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या