भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने वेळोवेळी आपण जगातील उत्कृष्ट खेळाडू का आहोत, हे दाखवून दिले आहे. प्रतिस्पर्ध्याच्या ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची धमक, फलंदाजीतील आपल्या उणीवांवर मात करण्यासाठी सातत्याने घेतलेली मेहनत असो , मैदानातील आक्रमकपणा किंवा आपल्या ‘स्टाईल सेन्स’ने मैदानाबाहेर चर्चेत राहणे असो, प्रत्येक ठिकाणी विराट स्वत:ला पूर्णपणे झोकून देतो. आता, त्याची ‘बिअर्ड स्टाईल’ आणि पिळदार शरीरयष्टीचीच गोष्ट घ्या ना. सध्याच्या घडीला तरूणांमध्ये विराटच्या या दोन गोष्टींची प्रचंड क्रेझ आहे. मात्र, या पिळदार शरीरयष्टीसाठी विराट कोहलीला जिममध्ये किती मेहनत घ्यावी लागते, याची कल्पना फारच कमी जणांना असेल.
अनुष्काच्या प्रेमात पडलेल्या कपुगेदराला विराटने केलं ‘आऊट’
‘बीसीसीआय’ने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून विराटच्या जिम वर्कआऊटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट भारतीय संघाचे फिटनेस प्रशिक्षक शंकर बसु यांच्या देखरेखीखाली वर्कआऊट करताना दिसत आहे. फिटनेससाठी विराटने काय काय करावे, याची एक भलीमोठी यादीच शंकर बसू यांनी फळ्यावर लिहिली आहे. यामध्ये त्याच्या व्यायाम प्रकारांचा आणि डाएटचा समावेश आहे. याशिवाय, व्हिडिओत विराट हेवी वर्कआऊट करतानाही दिसतो. शंकर बसू यांनी टीम इंडियातील सर्वच खेळाडुंच्या फिटनेससाठी डेस्का स्कॅन आणि यो यो ट्रेनिंगसारखे नवीन व्यायाम प्रकार सुरू केले आहेत.
MUST WATCH: What goes into the making of captain @imVkohli's well sculpt body? Find out here: https://t.co/xfZGE4Iyge #TeamIndia pic.twitter.com/2RgxxwOAr8
— BCCI (@BCCI) August 22, 2017