माझे तंत्र भारताशी अनुकूल -हेन्रिक्स

माझे गोलंदाजी आणि फलंदाजीचे तंत्र भारतीय वातावरणाशी अनुकूल आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मोझेस हेन्रिक्सने व्यक्त केले. आपल्या आवडत्या भारतात हेन्रिक्स हा कसोटी पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहे.

माझे गोलंदाजी आणि फलंदाजीचे तंत्र भारतीय वातावरणाशी अनुकूल आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मोझेस हेन्रिक्सने व्यक्त केले. आपल्या आवडत्या भारतात हेन्रिक्स हा कसोटी पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहे.
‘‘मी तरुण असताना बेजबाबदार होतो. अनेक दुखापतींवर मात केल्यानंतर मी माझ्या शरीराला साजेशा गोष्टी स्वीकारल्या. आता सातत्याने चांगली गोलंदाजी करण्याचा माझा प्रयत्न असेल. याचप्रमाणे रिव्हर्स स्विंगचाही खुबीने वापर करण्याच्या माझ्या योजना आहेत,’’ असे हेन्रिक्सने सांगितले. ‘‘फलंदाजीसंदर्भातही मी विचार केला आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांचा मी दडपण झुगारून सामना करेन,’’ असे तो पुढे म्हणाला.

भारतात एकदिवसीय सामने आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएल सामने खेळण्याचा अनुभव हेन्रिक्सच्या गाठीशी आहे. याविषयी हेन्रिक्स म्हणाला की, ‘‘भारतातील परिस्थितीची मला जाणीव आहे. याचप्रमाणे भारतीय वातावरणाच्या दृष्टीनेही मी काही योजना आखल्या आहेत. परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी पूर्णत: वेगळी खेळपट्टी असते. क्रिकेटच्या लघुप्रकारात फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ा बनविल्या जात नाहीत. याचप्रमाणे भारतात कसोटी क्रिकेटसाठी खेळपट्टय़ांचा संपूर्णपणे स्वतंत्र विचार केला जातो.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: My technic is appropriate with india henirks