पीटीआय, चेन्नई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कारणास्तव तो पहिल्या दोन सामन्यांतही खेळू शकला नव्हता. कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूची भारतीय संघाला उणीव भासणार यात शंकाच नाही. मात्र, त्याच्या अनुपलब्धतेमुळे भारतीय संघाचेच नाही, तर या मालिकेचे आणि जागतिक क्रिकेटचे खूप नुकसात होत आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले.

कोहलीच्या अनुपस्थितीत खेळताना भारताला हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, भारताने दमदार पुनरागमन करताना दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत पाच सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. या मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवला जाणार आहे.

हेही वाचा >>>U19 World Cup Semi Final: ठरलं! रविवारी भारत ऑस्ट्रलिया वर्ल्डकप फायनल; पाकिस्तानवर थरारक विजय

‘‘कोहली पुढील दोन कसोटी सामन्यांतही खेळणार नाही अशी चर्चा आहे. मात्र, भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतरच नक्की काय ते कळू शकेल. तो आणखी किती सामन्यांना मुकणार हे निश्चित नाही. परंतु कोहलीसारख्या खेळाडूची अनुपलब्धता हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. कोहली खेळत नसल्याने केवळ भारतीय संघाचे नाही, तर या मालिकेचे आणि जागतिक क्रिकेटचेही मोठे नुकसान होत आहे. मात्र, त्यामुळे या मालिकेचे महत्त्व कमी झालेले नाही. या मालिकेतील पहिले दोनही सामने चुरशीचे झाले आणि उर्वरित सामन्यांतही दोन्ही संघ दर्जेदार खेळ करतील यात शंका नाही,’’ असे हुसेन म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasir hussain believes kohli unavailability is a loss for world cricket including india sport news amy
First published on: 09-02-2024 at 03:57 IST