भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने जानेवारी २०२५ मध्ये लग्नगाठ बांधली. नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर ही टेनिसपटू आहे. तिने तिच्या करियरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हिमानीने टेनिसपटू म्हणून काम केलं आहे आणि आता तिने या खेळाला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या हिमानी हिच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे.

महिला एकेरीत हिमानीची कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग ४२ आहे. तिने पदार्पणाच्या पहिल्याच वर्षात ही कामगिरी केली. एकेरी व्यतिरिक्त, तिने दुहेरी सामने देखील खेळले आणि यातील तिची सर्वोच्च रँकिंग २७ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिमानीच्या वडिलांनी सांगितलं आहे की तिला १.५ कोटी रुपयांची नोकरीची ऑफर देखील होती जी तिने नाकारली.

हिमानीने दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी मिळवली आहे. याशिवाय तिने फ्रँकलिन पियर्स विद्यापीठातून क्रीडा आणि व्यवस्थापन विषयात पदवी देखील मिळवली आहे. हिमानीचा टेनिस सोडण्याचा निर्णय छोटासा नाही. कोणत्याही खेळाडूसाठी खूप कमी वयात कारकिर्दीला निरोप देणं सोपं नसतं. हा निर्णय घेण्यापूर्वी हिमानीने पुढे काय करायचं हे देखील निश्चित आहे.

हिमानी आता एक नवीन सुरूवात करणार आहे. म्हणूनच तिने एका मोठ्या नोकरीच्या ऑफरलाही नकार दिला आहे. हिमानीने आता क्रीडा व्यवसायात हात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ती एक ती बिझनेस वुमन बनण्याच्या मार्गावर आहे.

हिमानी किंवा नीरज चोप्रा यांच्याकडून अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत बातमी आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की हिमानी स्पोर्ट्स बिझनेस सुरू करणार आहे. ती काय करणार आहे आणि कधीपासून सुरुवात करणार आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हिमानी आणि नीरज यांचे लग्न या वर्षी जानेवारीमध्ये झाले. हे लग्न निवडक कुटुंबिय आणि मित्रपरिवारासह झाले. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या लग्नाची माहिती दिली होती. हे लग्न हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये झालं. लग्नानंतर लगेचच दोघेही अमेरिकेला गेले कारण नीरजला एका स्पर्धेत भाग घ्यायचा होता. यामुळे लग्नानंतर अद्याप रिसेप्शन झालेलं नाही.