Neeraj Chopra, Diamond League: दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे.ज्युरीचमध्ये पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेतील अंतिम सामन्यात नीरज चोप्राला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण सलग तिसऱ्यांदा त्याला दुसऱ्या स्थानी दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. डायमंड लीग २०२५ स्पर्धेतही ८५.०१ मीटर लांब थ्रो करून तो दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तर जर्मनीच्या जुलियन वेबरने ९० मीटर लांब थ्रो करून जेतेपदाचा मान पटकावला.

नीरज पहिल्याच प्रयत्नात ८४.३५ मीटर लांब थ्रो केला. तिसऱ्या थ्रो पर्यंत तो तिसऱ्या स्थानी होता. त्यानंतर त्याने आपल्या शेवटच्या प्रयत्नात८५.०१ मीटर लांब थ्रो केला आणि दुसऱ्या स्थानी कब्जा केला. तर जेतेपदाचा मानकरी ठरलेल्या आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात ९१.५७ मीटर लांब थ्रो करून या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो ठरला. दरम्यान याच कामगिरीच्या बळावर त्याने डायमंड लीग २०२५ स्पर्धेचं जेतेपदही पटकावलं.

नीरजने पहिल्या प्रयत्नात ८४.३५ मीटर लांब थ्रो केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८२.०० मीटर लांब थ्रो केला. त्यानंतर पुढे त्याने सलग ३ फाऊल थ्रो केले. ५ थ्रो झाल्यानंतर नीरज या यादीत तिसऱ्या स्थानी होता. त्याच्याकडे शेवटची एकच संधी शिल्लक होती. शेवटचा थ्रो त्याने ८५.०१ मीटर लांब फेकून दुसऱ्या स्थानी उडी घेतली. याआधी २०२२ मध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरजने दमदार कामगिरी केली होती. तो ज्युरीखमध्ये डायमंड लीग जिंकणारा पहिलाच भारतीय ठरला होता. त्यानंतर २०२३ मध्ये युजीन आणि २०२४ मध्ये ब्रुसेल्समध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे आता सलग तिसऱ्यांदा त्याने या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

नीरज चोप्रा काय म्हणाला?

या स्पर्धेनंतर बोलताना नीरज चोप्रा म्हणाला, “आजचा दिवस खूप कठिण होता. खेळात हे होत राहतं आणि आजचा दिवस माझ्यासाठी खू प कठिण होता. त्यानंतर मी शेवटच्या प्रयत्नात ८५ मीटर लांब थ्रो केला. पण आज माझा टायमिंग आणि रनअप मुळीच चांगला नव्हता. माझ्याकडे वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करण्यासाठी ३ आठवड्यांचा कालावधी आहे.” आता नीरज या पराभवाचा बदला घेऊन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.