महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नावावर आहे. झुलन यशाच्या शिखरावर पोहोचली असली तरी मी कधीही विक्रमांसाठी खेळली नाही, असे मत तिने व्यक्त केले आहे.
महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक १८० बळींचा विक्रम ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरिन फिट्सपॅट्रिकच्या नावावर होता. पण दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चौरंगी क्रिकेट मालिकेत झुलनने हा विक्रम मोडीत काढला, तिच्या नावावर सध्याच्या घडीला १८५ बळी आहेत.
संघ खेळत असतो तेव्हा वैयक्तिक विक्रमांना जास्त महत्त्व नसते. मी कधीही विक्रमांसाठी खेळले नाही, पण क्रिकेट या खेळावर माझे अतोनात प्रेम आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने खेळत असता तेव्ही तुमच्याकडून विक्रम होतच असतात,’ असे झुलन म्हणाली.