30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचं आज अनावरण करण्यात आलं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनी, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे हे खेळाडू या सोहळ्याला उपस्थित होते. याचसोबत महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमायमा रॉड्रीग्जही यावेळी उपस्थित होती.

Nike या कंपनीने भारतीय संघाच्या जर्सीचं प्रायोजकत्व स्विकारलं आहे. ही जर्सी टाकाऊ वस्तुंपासून बनवण्यात आल्याचंही यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. काही महत्वाच्या गोष्टींचा अपवाद वगळला तर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये कोणतेही महत्वाचे बदल करण्यात आलेले नाहीयेत. 30 मे पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारत आपला पहिला सामना 6 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे बदललेल्या जर्सीसोबत टीम इंडियाची विश्वचषकातली कामगिरीही चांगली होते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.