न्यूझीलंडच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एक नवा विक्रम नोंदविला. धोनीने रॉस टेलरचा झेल घेत यष्टीमागे ३०० बळी मिळविण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच आणि जगातील चौथा यष्टीरक्षक आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट(४७२), श्रीलंकेचा कुमार संगकाराने (४४३) आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचरने (४२५) बळी घेतले आहेत. त्यामुळे आता ३०० बळी घेतलेल्या ढोणीचे या यादीमध्ये नाव सामील झाले आहे. ढोणीने आतापर्य़ंत एकदिवसीय सामन्यात २२१ झेल आणि ७९ यष्टिचीत केले आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान सुरु असलेल्या सामन्यात ढोणीने रॉस टेलरचा झेल घेतला आणि ३०० बळीचा घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला. न्यूझीलंडविरुद्ध त्याने आतापर्यंत दहा बळी घेतले आहेत. याबरोबरच भारताच्या मोहम्मद अझरुद्दीनलाही त्याने मागे टाकले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
महेंद्रसिंग धोणीचा नवा विक्रम
न्यूझीलंडच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एक नवा विक्रम नोंदविला.

First published on: 19-01-2014 at 01:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New record by indian captain mahendra singh dhoni