वृत्तसंस्था, मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेट हंगामातील सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) हा नवा नियम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, सर्व राज्य संघटनांना ई-मेलद्वारे ‘बीसीसीआय’ने या नियमाच्या अंमलबजावणीबाबत कळवले आहे.

‘बीसीसीआय’ गेल्या काही वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हा नियम आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यापूर्वी त्यांनी या नियमाचा पहिला प्रयोग सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत करून पाहाण्याचे ठरवले आहे. ही संकल्पना या स्पर्धेत यशस्वी ठरल्यास ‘आयपीएल’मध्ये २०२३ पासून या नियमाचा समावेश करण्यात येईल, असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे. या नियमाने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अधिक आकर्षकता येईल, असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंमलबजावणी कशी होणार?

  • नाणेफेकीदरम्यान प्रतिस्पर्धी संघ चार राखीव खेळाडूंची नावे देतील
  •   दोन्ही डावांतील १४व्या षटकापूर्वी एखाद्या खेळाडूला बदलून चारपैकी एका प्रभावी खेळाडूला संधी मिळेल
  • एखादा फलंदाज बाद झाला असला, तरी त्याच्या जागी प्रभावी खेळाडूचा समावेश होऊ शकेल. त्याला फलंदाजी करता येईल
  • एखाद्या गोलंदाजाची काही षटके संपल्यानंतरही त्याला बदलता येईल. बदली गोलंदाज म्हणून प्रभावी खेळाडू चार षटके टाकू शकेल