पुणे : क्रीडा नैपुण्याने महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून, यातून आतापर्यंत समाविष्ट असलेल्या सहा क्रीडाप्रकारांना वगळण्यात आले आहे. यात कॅरम, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग), बिलियर्ड्स-स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ आणि यॉटिंग या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. राज्य क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबाबत क्रीडाक्षेत्रातून संतापाची लाट उसळली आहे.

शासनाने नव्याने जाहीर केलेल्या पुरस्कार नियमावलीनुसार, वगळण्यात आलेल्या खेळासंदर्भात ऑलिम्पिक प्रकार नसल्याचा किंवा राज्यात त्या खेळाचा प्रसार नसल्याची कारणे देण्यात आली आहेत. त्याच बरोबर वगळण्यात आलेल्या खेळांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) मान्यता नसल्याचेही समोर आले आहे. शासनाने दिलेली कारणे हा पूर्णपणे लालफितीचा कारभार असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत या प्रत्येक खेळातील खेळाडूला शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात येत होते. 

n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम, बिलियर्ड्स-स्नूकर या चार खेळांचा ऑलिम्पिक किंवा अन्य कुठल्याही मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत समावेश नसल्याचे कारण देण्यात आले आहे. या खेळांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेचीही मान्यता नसल्याचे राज्य क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>Steve Waugh: स्टीव्ह वॉने कसोटी क्रिकेट संपुष्टात आल्याबद्दल व्यक्त केली चिंता; म्हणाला, “ICCने हस्तक्षेप केला नाही तर…”

आटय़ापाटय़ासाठी पारंपरिक खेळाची सबब

आटय़ापाटय़ा खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धाची माहिती गेली अनेक वर्षे समोर येत नसतानाही या खेळाला पुरस्कारांना सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी पुरस्कार मिळाला आहे.आटय़ापाटय़ा खेळाच्या मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर असूनही केवळ पारंपरिक क्रीडा प्रकार म्हणून या खेळाला सामावून घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात राष्ट्रीय स्पर्धा व्हायलाच हव्यात अशी अट नाही. राष्ट्रीय स्तरावरीलही स्पर्धाचे गुण ग्राह्य धरले जातील असा बचाव करण्यात आला आहे. शासकीय माहितीनुसार, आटय़ापाटय़ा संघटनेची राज्य संघटना अस्तित्वात असून २६ संलग्न जिल्हा संघटना असल्याचे समजते.

अन्य महत्वाच्या शिफारशी

’ अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू थेट शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र. त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. हा पुरस्कार जादाचा पुरस्कार म्हणून गणला जाणार.

’ रेल्वे, बँक, पोलीस, एअर इंडिया, पेट्रोलियम मंडळ अशा संस्थातून राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूची कामगिरी ग्राह्य धरली जाणार. 

’ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतील सहभाग हा राज्यातील अधिकृत विद्यापीठामार्फत असायला हवा.  

केंद्र सरकारच्या सेवेत कॅरमपटूंना सामावून घेतले जाते. राज्य सरकार कॅरमसाठी काय करते? शासकीय सेवेतील राखीव आरक्षणाचा फायदा कधीच मिळाला नाही. केवळ शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला जात होता. आता तो देखिल काढून घेतला. आता युवकांना कॅरम खेळण्यासाठी कसे आकर्षित करायचे- अरुण केदार, सचिव, महाराष्ट्र कॅरम संघटना

शरीरसौष्ठव खेळाला शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीतून वगळण्यात आल्यामुळे अनेक गुणवान खेळाडूंवर अन्याय होणार आहे. खेळाच्या माध्यमातून सुदृढ पिढी घडविण्याच्या योजनेला खिळ बसणार आहे. खेळाडूंचे मनोधैर्य खचणार आहे.- संजय मोरे, सरचिटणीस, भारतीय शरीरसौष्ठव संघटना