सोफनी डेव्हिन हिच्या शैलीदार शतकामुळे न्यूझीलंडने महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर १५० धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली.
सोफनी हिने १३ चौकार व सहा षटकारांसह १४५ धावा केल्या. तिने सुझो बेट्स (७२) हिच्या साथीने १२८ धावा, तर निकोली ब्राऊनी (नाबाद ४०) हिच्या साथीने १०२ धावांची भागीदारी केली. त्यामुळेच न्यूझीलंडला ५० षटकांत ५ बाद ३२० धावा करता आल्या. त्यानंतर सिऑन रुक (४/३१) व मोर्ना निल्सन (३/३४) यांच्या प्रभावी माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४१ षटकांत १७० धावांवर कोसळला.
संक्षिप्त निकाल
न्यूझीलंड : ५० षटकांत ५ बाद ३२० (सोफनी डेव्हिन  १४५, सुझो बेट्स ७२, सारा मॅकग्लेशन ३२, निकोली ब्राऊनी नाबाद ४०) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : ४१ षटकांत सर्वबाद १७० (सुसान बेनाडे ३७, शबरीम इस्माईल ३१, सिमोन पेरेझ २९; सिऑन रुक ४/३१, मोर्ना निल्सन ३/३४)