South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे तिन्ही संघांने त्रिकोणीय मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५ गडी बाद १८० धावा केल्या होत्या.दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात ७ धावा करायच्या होत्या. शेवटी हेनरीने दमदार गोलंदाजी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

शेवटच्या षटकात लागला निकाल

या सामन्यात धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजयासाठी ७ धावांची गरज होती. त्यावेळी जॉर्ज लिंडे १० धावांवर तर डेवाल्ड ब्रेविस ३१ धावांवर नाबाद होता. न्यूझीलंडकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी मॅट हेनरी गोलंदाजीला आला. सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या हातात होता. पण षटकातील पहिलाच चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेविस झेलबाद होऊन माघारी परतला . ब्रेविस बाद झाल्यानंतर कॉर्बिन बॉश फलंदाजीला आला. त्याने पुढील ३ चेंडूंवर २ धावा घेतल्या. शेवटच्या २ चेंडूंवर सामना जिंकण्यासाठी ४ धावा करायच्या होत्या. या षटकातील पाचव्या चेंडूवर लिंडे विकेट फेकून माघारी परतला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला ४ धावांची गरज होती. या चेंडूवर हेनरीने एकही धाव खर्च केली नाही. शेवटच्या षटकात मायकल ब्रेसवेल आणि डॅरील मिचेलने सीमारेषेवर भन्नाट झेल घेतले. हे दोन्ही झेल न्यूझीलंडच्या विजयाचं कारण ठरले. यासह न्यूझीलंडने हा सामना ३ धावांनी जिंकून मालिकाही आपल्या नावावर केली.

न्यूझीलंडने केल्या १८० धावा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीला आलेल्या टीम सिफर्टने २८ चेंडूंचा सामना करत ३० धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनव्हेने ३१ चेंडूंचा सामना करत ४७ धावा केल्या. रचीन रविंद्रने २७ चेंडूत ४७ धावा केल्या.डॅरील मिशेलने १६ आणि मायकल ब्रेसवेलने १५ धावा केल्या. यासह न्यूझीलंडने २० षटकांअखेर ५ गडी बाद १८० धावा केल्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना लुंगी एन्गिडीने २ गडी बाद केले. तर नांद्रे बर्गरने, क्वेना मफाका आणि सेनुरान मुथुस्वामीने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लुआन-द्रे प्रिटोरियसने दमदार अर्धशतकी खेळी केली. रिझा हेंड्रिक्सने ३७ धावांची खेळी केली. तर रासी व्हॅन डर डुसेनने १८ धावांची खेळी केली. शेवटी डेवाल्ड ब्रेविसने ३१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयापासून ३ धावा दूर राहिला.